महाराष्ट्र राज्याची निर्मिती एक मे 1960 रोजी झाली आहे. महाराष्ट्र मध्ये एकूण 36 जिल्हे आहेत. या जिल्ह्यांमधील परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या बाबी देण्यात आल्या आहेत.
![]() |
महाराष्ट्रातील जिल्ह्यांची वैशिष्ट्ये |
स्पर्धा परीक्षांची ऑनलाइन तयारी करणाऱ्या उमेदवारांच्या तयारीला गती देण्यासाठी आमच्या वेबसाइटवर महाराष्ट्रातील जिल्ह्यांची वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत. जे तुम्हाला तुमच्या परीक्षेसाठी सर्वोत्तम तयारी करण्यास मदत करतील.
स्पर्धा परीक्षेची तयारी करताना भूगोल विषय खूप महत्त्वाचे असतात म्हणून आपण या विषयातील जिल्हावार माहिती खाली दिली आहे.
खालील माहिती तुम्हाला आवडली, तर नक्की आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा.
⚽महाराष्ट्रातील जिल्ह्यांची वैशिष्ट्ये⚽
1)कोकण विभाग
१)पालघर-
![]() |
पालघर जिल्हा |
- पालघर जिल्ह्यात ८ तालुके आहेत.
- सर्वात शेवटी अस्तित्वात आलेला जिल्हा (2014)
- पालघरचे महाबळेश्वर - जव्हार
- देशातील पहिला अणुविद्युत प्रकल्प - तारापूर
२)ठाणे-
![]() |
ठाणे जिल्हा |
- ठाणे जिल्ह्यात ७ तालुके आहेत.
- सर्वाधिक महानगरपालीकांचा जिल्हा (6)
- तलावांचे शहर - ठाणे
- पाणी पिकवणारा जिल्हा
- श्रीस्थानक प्राचिन नाव
३)मुंबई उपनगर -
![]() |
मुंबई उपनगर |
- मुबई उपनगर जिल्ह्यात ३ तालुके आहेत.
- साष्टी बेटांवर वसलेला जिल्हा
- संजय गांधी राष्ट्रीय उद्यान-बोरीवली
- रोमन कॅथॉलिक माऊंट मेरी चर्च-वांद्रे
४)मुंबई शहर-
![]() |
मुंबई शहर |
- मुंबई शहर जिल्ह्यात एकही तालुका नाही.
- सात बेटांचे शहर
- क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा
- एकही तालुका नसलेला जिल्हा
- दक्षिण मुंबई
- जुनी मुंबई
- Island City
- लंडनच्या 'बिग-बीनच्या धर्तीवरील राजाबाई टॉवर
- महाराष्ट्राची आर्थिक राजधानी
- मुंबई विद्यापिठ
- राज्याचे उच्च न्यायालय
- गेट-वे-ऑफ-इंडिया
- छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ
- सहारा विमानतळ
- फिरोजशहा मेहता उद्यान (हँगिंग गार्डन)
- तारापोरवाला मत्सालय
- छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय (प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम)
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (व्हिक्टोरिया टर्मिनस)
- जहांगिर आर्ट गॅलरी
- नेहरू विज्ञान भवन
- जिजामाता उद्यान
- भायखळा (हिक्टोरीया गार्डन/राजीचा बाग)
५)रायगड -
![]() |
रायगड जिल्हा |
- रायगड जिल्ह्यात १५ तालुके आहेत.
- कुलाबा पुर्वीच नाव
- छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी - रायगड किल्ला
- जवाहरलाल नेहरू बंदर -- न्हावाशेवा
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापिठ - लोणेरे
- मथिरान थंड हवेचे ठिकाण - ता. कर्जत
- कर्नाळा पक्षी अभयारण्य
- आचार्य विनोबा भावेंचे जन्मस्थान- गागोेदे, ता.पेन
- आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचे जन्मगाव-शिरोग (ता.पनवेल)
- बल्लाळेश्वर व पाली हे दोन अष्टविनायकांपैकी
- पेण येथील गणेशमुर्ती प्रसिद्ध
- धबधब्यांचे शहर - खोपोली
- हरिहरेश्वर- शिवमंदीर, समुद्र किनारा, देवघर (हाऊस ऑफ गॉड)
- शिवथरघळ (सुंदरमठ) - समर्थ रामदासांनी दासबोध ग्रंथ लिहीला.
- हिंदुस्तान ऑरगॉनिक केमिकल्स लि. (HOCL) सर्वप्रथम स्थापन
महाराष्ट्र जिल्हा विशेष
६)रत्नागिरी-
![]() |
रत्नागिरी जिल्हा |
- रत्नागिरी जिल्ह्यात ९ तालुके आहेत.
- मासेमारीसाठी प्रसिद्ध
- सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेला जिल्हा - 237 km
- शिरगोळा हा रांगोळीचा दगड
- कुरूंद हा जात्याचा दगड
- डॉ. बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठ - दापोली
- मार्लेश्वर धबधबा - गंगोत्री नदीवर
- स्वा. सावरकरांनी उभारलेले पतित पावन मंदीर
- थिबा पॅलेस (मॅनमारच्या थिबा राजाची समाधी)
- मिरकरवाडा हे मच्छिमारी केंद्र
- वेळास - नाना फडणवीस यांची जन्मभूमी,
- ऑलिव्ह रिडले कासव महोत्सव गणपतीपुळे
- नारळ संशोधन केंद्र-भाट्ये
- दापोली- कोकण कृषी विद्यापिठाच मुख्यालय, रत्नागिरी जिल्ह्याचे महाबळेश्वर
- स्वामी स्वरुपानंदांची समाधी - पावस
- राजापुरजवळील उन्हाळे तीर्थक्षेत्रावरील लुप्त होणारी गंगा
७)सिंधुदुर्ग-
![]() |
सिंधुदुर्ग जिल्हा |
- सिंधुदुर्ग जिल्ह्यात ८ तालुके आहेत.
- महाराष्ट्राच्या सर्वात दक्षिणेकडील जिल्हा
- सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा (2011 ची जणगणना)
- परुळे चिपी येथे राज्यातील 14 वे विमानतळ प्रसिद्ध
- सिंधुदुर्ग किल्ला - कुरटे बेटांवर
- कोकणची दक्षिण काशी- आंगणेवाडी, ता. मालवण,
- सावंतवाडी- लाकडी खेळणी प्रसिद्ध
- महाराष्ट्रातील पहिला पवन विद्युत प्रकल्प- जमसांडे, ता.देवगड
- पाहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित
- महाराष्ट्राचा पहिला इ-ऑफिस प्रणाली जिल्हा
2)पुणे विभाग
१)पुणे-
![]() |
पुणे जिल्हा |
- पुणे जिल्ह्यात १४ तालुके आहेत.
- विद्येचे माहेरघर
- पुणे विद्यापिठ - पूर्वेकडील ऑक्सफर्ड
- हिंदुस्थान अॅन्टीबायोटीक्स - पिंपरी
- खडकी, देहूरोड, पुणे कॅम्प येथे संरक्षण साहित्य निर्मिती
- कागद गिरणी-मुंढवा
- काच उद्योग - तळेगाव दाभाडे
- टिळक महाराष्ट्र विद्यापिठ - पुणे
- श्री शिवछत्रपती क्रीडा विद्यापिठ - पुणे
- (आर्वी ता. जुन्नर) येथे विक्रम हे दळणवळण केंद्र
- मुळा- मुठा नदीच्या संगमावर
- पेशव्यांची राजधानी,
- शनिवारवाडा, लाल महाल या ऐतिहासीक वास्तू
- सारसबाग,
- पर्वती टेकडी
- आळंदी - संत ज्ञानेश्वरांची समाधी, प्रसिद्ध आषाढी यात्रा येथेच निघते.
- देहू- तुकोबारायांची जन्मभूमी
- छ. संभाजी महाराज समाधी - वढू (ता. शिरूर)
- सोपानदेवांची समाधी-सासवड
२)सातारा -
![]() |
सातारा जिल्हा |
- सातारा जिल्ह्यात ११ तालुके आहेत.
- कोयना धरण (जलाशय: शिवाजीसागर) - ता. पाटण, सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प
- महाराष्ट्र उर्जा विकास अभिकरणाचा सर्वात मोठा पवन विदयुत निर्मिती करणारा प्रकल्प - वनकुसंडे
- महाबळेश्वर, पाचगणी येथे मधुमक्षिकापालन केंद्र
- कास पठार
- समर्थ रामदासांची समाधी - सज्जनगड
- मायणी (ता. खटाव) येथे पक्षी अभायारण्य
- महाबलळेश्वर-महाराष्ट्राचे नंदनवन (Queen of Hill Stations)
- कराड - कृष्णा, कोयना प्रितीसंगम, स्व. यशवंतराव चव्हाण समाधी
- लोणंद येथे कांदयाची बाजारपेठ
३)सांगली -
![]() |
सांगली जिल्हा |
- सांगली जिल्ह्यात १० तालुके आहेत.
- हळदीचा वायदेबाजार प्रसिद्ध
- मोहरम प्रसिद्ध
- कृष्णा - येरळा संगम - ब्रम्हनाळ
- स्व. यशवंतराव चव्हाणांची जन्मभूमी-देवराष्ट्र, ता. कडेगाव
४)कोल्हापूर-
![]() |
कोल्हापूर जिल्हा |
- कोल्हापूर जिल्ह्यात १२ तालुके आहेत.
- करवीर नगरी,
- चित्रनगरी
- दक्षिण काशी
- राधानगरी धरण - भोगावती नदीवर
- श्री. काळम्मावाडी प्रकल्प - महाराष्ट्र व कर्नाटक यांचा संयुक्त प्रकल्प
- तिलारी प्रकल्प - महाराष्ट्र व गोवा यांचा संयुक्त प्रकल्प
- कागल येथे नव्यानेच पंचतारांकित औद्योगिक वसाहत
- फौंड्री हा प्रसिद्ध व्यवसाय
- कोल्हापूरी चपल जगप्रसिद्ध
- आशियातील पहिली सूतगिरणी- इचलकरंजी (महाराष्ट्राचे मँचेस्टरी)
- शिवाजी विद्यापिठ - कोल्हापूर
- ऐतिहासिक राजधानी
- महालक्षी मंदिर,
- रंकाळा तलाव,
- मोतीबाग तालीम,
- खासबाग कुस्ती आखाडा
- शहपूरी - गुळाची बाजारपेठ
- धरणांचा तालुका-राधानगरी
- गव्यांचे अभयारण्य - दाजीपूर
५)सोलापूर -
![]() |
सोलापूर जिल्हा |
- ज्वारीचे कोठार
- वस्त्रोद्योगाचे प्रमुख केंद्र
- सोलापूरचे पक्षितिर्थ- हिप्परगा तलाव पंढरपूरजवळ
- भीमेला चंद्रभागा म्हणतात.
- उजनी प्रकल्प - भीमा नदीवर
- विठ्ठल-रुक्मिणी मंदिर - पंढरपूर
- माळढोक पक्षी अभयारण्य - नान्नज
- 3)नाशिक विभाग
१)नाशिक -
![]() |
नाशिक जिल्हा |
- नाशिक जिल्ह्यात १५ तालुके आहेत.
- धरणांचा जिल्हा
- द्राक्ष प्रसिद्ध
- पहिले मातीचे धरण - गंगापूर (गोदावरीवर)
- कांदा व लसून - निफाड व लासलगाव
- चलनी नोटांचा कारखाना
- मिंग विमानांचा कारखाना- ओझर
- राष्ट्रीय औष्णिक विद्युत प्रकल्प- एकलहरे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठ महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापिठ
- 12 वर्षांनी कुंभमेळा भरतो - गोदावरी काठावर गुलशनाबाद प्राचीन नाव
- विपश्यना संशोधन केंद्र-इगतपूरी
- डॉ. आंबेडकरांनी हिंदूधर्म त्यागाची घोषणा येथेच केली.
- महाराष्ट्राचे भरतपुर - नांदूर मध्यमेश्वर
- स्व. सावरकरांचे जन्मगाव- भगूर
- त्र्यंबकेश्वर हे ज्योतिलिंग - जोर
- राज्य पोलिस अॅकॅडमी,
- काळाराम मंदीर,
- पंचवटी,
- सिता कुंड,
- तपोवन
- महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था (मेरी)
- पैठण्या व पितांबर जगप्रसिद्ध-येवले
२)अहमदनगर -
![]() |
अहमदनगर जिल्हा |
- अहमदनगर जिल्ह्यात १४ तालुके आहेत.
- क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा साखर उत्पादनात प्रथम क्रमांक
- विल्सन बंधारा (ऑर्थर लेक) - प्रवरानदी(ता.अकोले)
- मोसंबी जगप्रसिद्ध- श्रीरामपूर
- ऊस क्षेत्र व उत्पादनात दुसरा क्रमांक (राज्यात)
- देशातील पहिला सहकारी साखर कारखाना- प्रवरा-लोणी (कै. विखेपाटील)
- महात्मा फुले कृषी विद्यापिठ - राहूरी
- ज्ञानश्वरांची समाधी -नेवासे (प्रवरा नदीकाठी)
- भारताचा शोध (Discovery of India) हा ग्रंथ पं. नेहरूंनी अहमदनगरच्या तुरुंगात लिहीला.
- महाराष्ट्राचे जेरूसलेम - सेट तेरेसा चर्च (हरेगाव-ता. श्रीरामपूर)
- भंडारदरा हे थंड हवेचे ठिकाण
- कळसूबाई सहयाद्रीतील सर्वोच्च शिखर - 1646 मी.
- देऊळगाव-रहेकुरी काळविट अभयारण्य (ता. कर्जत)
- रांजण खळणे-निघोज (ता. पारनेर)
- अधोमुखी व उर्ध्वमुखी लवणस्तंभ - कान्हूर (ता. पारनेर)
३)धुळे -
![]() |
धुळे जिल्हा |
- धुळे जिल्ह्यात ४ तालुके आहेत.
- दुधा तुपाचा जिल्हा
- भुईमुग उत्पादनात प्रथम
- धुळे शहराचा आराखडा सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांनी निश्चित केला
- पांझरा नदी काठी
- मिरचीचा मोठा बाजार- दौंडाई (ता. शिंदखेड)
४)नंदुरबार -
![]() |
नंदुरबार जिल्हा |
- नंदुरबार जिल्ह्यात ६ तालुके आहेत.
- अति उत्तरेकडील जिल्हा
- 100% आदिवासी जील्हा
- देवमोगरा देवी श्रद्धास्थान
- अस्तंभा शिखर - ता. अक्राणी
- तोरणमाळ थंड हवेचे ठिकाण
- खानदेशची काशी/ दक्षिण काशी - प्रकाशे ता. शहादा
५)जळगाव-
![]() |
जळगाव जिल्हा |
- जळगाव जिल्ह्यात १५ तालुके आहेत.
- अजिंठ्याचे प्रवेशद्वार
- कापूस उत्पादनात आघाडीवर,
- तेलबिया उत्पादन आधाडीवर
- तापी-पूर्णा संगम,
- अप्पर तापी प्रकल्प- हातनूर
- केळी प्रसिद्ध (यावल-केळी संशोधन केंद्र)
- संरक्षण साहित्य निर्मिती कारखाना - वरणगाव (भुसावळ)
- औष्णीक विद्युत प्रकल्प - पोकरी
- उत्तर महाराष्ट्र विद्यापिठ
- श्रेष्ठ गणिततज्ञ भास्कराचार्याचे जन्मगाव-पाटणादेवी
4)नागपूर विभाग
१)नागपूर -
![]() |
नागपूर जिल्हा |
- नागपूर जिल्ह्यात १४ तालुके आहेत.
- भारताची व्याघ्र राजधानी,
- महाराष्ट्राची उपराधानी
- संत्री जगप्रसिध्द,
- हिवाळी अधिवेशनाचे ठिकाण
- भारताचे दुसरे हरितशहर
- डॉ. आंबेडकरांनी येथे बौद्ध धर्माचा स्विकार केला, (नागभूमी)
- 0 मैल (Zero Mile)
- पेंच प्रकल्प - पंचनदी -महाराष्ट्र व मध्यप्रदेश राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापिठ
- महाराष्ट्र पशु व मत्सविज्ञान विद्यापिठ
- राष्ट्रीय लिंबू संशोधन केंद्र - काटोल
- मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपिठ
- राज्यातील पहिला डिजीटल जिल्हा
- मारबत महोत्सव प्रसिद्ध
महाराष्ट्रातील जिल्ह्यांची टोपण नावे
२)वर्धा -
![]() |
वर्धा जिल्हा |
• सेवाग्राम - म. गांधींचा आश्रम
- पवनार - आचार्य विनोबा भावेंचा आश्रम
- राष्ट्रभाषा (हिंदी) प्रचार समितीचे मुख्यालय कापसाची बाजारपेठ - आर्वी
- आष्टी- 1942 च्या आंदोलनात प्रकाशात आलेले ठिकाण
३)भंडारा -
![]() |
भंडारा जिल्हा |
- भंडारा जिल्ह्यात ७ तालुके आहेत.
- तांदूळ हे प्रमुख पिक (तांदळाची मोठी बाजारपेठ)
- तुमसर तालुक्यात मँगनीज खाणी
- संरक्षण साहित्य निर्मिती कारखाना - जवाहरनगर
- तलावांचे शहर / जिल्हा
- लोह पोलाद प्रकल्प
४)गोंदिया -
![]() |
गोंदिया जिल्हा |
- गोंदिया जिल्ह्यात ८ तालुके आहेत.
- तलावांचा जिल्हा-
- इटियाडोह प्रकल्प - ता. अर्जुनी मोरगाव - गाढवी नदिवर
- तेंदूच्या पानांपासून विड्या विकण्याचा उद्योग- तिरोडा
- नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान- ता. अर्जुनी मोरगाव
- नागझिरा अभयारण्य - ता. गोरेगाव
५)गडचिरोली-
![]() |
गडचिरोली जिल्हा |
- गडचिरोली जिल्ह्यात १२ तालुके आहेत.
- अतिपूर्वेकडील जिल्हा
- लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेला जिल्हा
- महाराष्ट्रातील सर्वाधिक वनक्षेत्र
- वर्धा-वैनगंगा संगम (चपराळा)
- उद्योगविरहित जिल्हा
- लोहखनिज समृद्ध जिल्हा
- बांबूपासून कागद निर्मिती- देसाईगंज
- नागेपल्ली (हेमलकसा)- बाबा आमटेंचा कुष्टरोग्यांसाठी आश्रम
- लोक बिरादरी हा बाबा आमटेंचा आदिवासी विकास प्रकल्प
- गोंडवाना विद्यापीठ
- रेलानृत्य
- विदर्भाचे खजुराहो/ मिनी चजुराहो - मार्कडेश्वर महादेव मंदीर
६)चंद्रपुर-
![]() |
चंद्रपूर जिल्हा |
- चंद्रपूर जिल्ह्यात १५ तालुके आहेत.
- इरई नदीकाठी
- आनंदवन - बाबा आमटेंनी कुष्टरोग्यांच्या सेवेसाठी स्थापन केले. (वरोडा येथे)
- असोलमेंढा धरण- पाथरीनदी
- माडिया गोंड ही अतिमागास जमात
- राज्य शासनाचे ग्रामसेवक व ग्रामसेविका प्रशिक्षण केंद्र - सिंदेवाही
WhatsApp Channel link Join Now
5)अमरावती विभाग
१)अमरावती -
![]() |
अमरावती जिल्हा |
- अमरावती जिल्ह्यात १४ तालुके आहेत.
- कर्मयोगी संत गाडगेबाबा विद्यापिठ
- तपोवन - डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांनी कुष्टरोग्यांसाठी स्थापन केले.
- शिवाजी शिक्षण संस्था व श्रद्धानंद छात्रालय - डॉ. पंजाबराव देशमुख
- विदर्भाचे काश्मिर / विदर्भाचे नंदनवन - चिखलदरा
- मेळघाट - वाघांचे अभयारण्य,
- कोरकू आदिवासींचे निवासस्थान
- तुकडोजी महाराजांचे जन्मगाव-यावली
- विदर्भातील सर्वात मोठी हळद व मिरचीची बाजारपेठ- शेडूरजनघाट
- उदुंबरावती प्राचीन नाव
- राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा गुरुकुंज आश्रय व समाधी - मोझरी
- रोरा सरपणमुक्त व चराईमुक्त गाव
- गाडगेबाबांची कर्मभूमी- आमला (ता. दर्यापूर)
- गाडगेबाबांचे अंतिम श्रद्धास्थान-नागरवाडी (ता. चांदूरबाजार)
२)बुलढाणा-
![]() |
बुलढाणा जिल्हा |
- बुलढाणा जिल्ह्यात १३ तालुके आहेत.
- भिल्लठाणा जुने नाव
- राजमाता जिजाऊंचे जन्मगाव-सिंदखेडराजा
- लोणार सरोवर
- जगातील तिसर्या क्रमांकाची उंच हनुमान मूर्ती - नांदूर (105 फूट)
- संत गजानन महाराज मंदीर-शेगाव
- अंबाबरवा अभयारण्य व थंड हवेचे ठिकाण
३)अकोला -
![]() |
अकोला जिल्हा |
- अकोला जिल्ह्यात ७ तालुके आहेत.
- मोर्णा नदीच्या काठावर
- खरीप ज्वारीच्या उत्पादनात राज्यात आघाडीवर डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठ
- नर्नाळा - अभायारण्य,
- 27 दरवाजांचा ऐतिहासिक किल्ला
- संत गाडगेबाबांचा आश्रम- मूर्तिजापूर
४)वाशिम-
![]() |
वाशिम जिल्हा |
- वाशिम जिल्ह्यात ६ तालुके आहेत.
- पैनगंगा प्रमुख नदी
- वत्सगुलम पूर्वीचे नाव
५)यवतमाळ -
![]() |
यवतमाळ जिल्हा |
- यवतमाळ जिल्ह्यात १६ तालुके आहेत.
- पांढरे सोने पिकवणारा जिल्हा
- भारतीय इतिहास संशोधन संबंधित शारदाश्रम संस्था
- विदर्भाचा नायगरा- सहस्त्रकुंड धबधबा (पैनगंगा नदीवर)
- गंधक मिश्रीत औषधी पाण्याचा झरा - कापेश्वर
- कोलाम ही अतिमागास जमात
6)छत्रपती संभाजीनगर विभाग
१)छत्रपती संभाजीनगर -
![]() |
छत्रपती संभाजीनगर जिल्हा |
- छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ९ तालुके आहेत
- महाराष्ट्राची पर्यटन राजधानी (2016)
- राज्यातील सर्वात मोठा बहुदेशीय प्रकल्प - जायकवाडी (गोदावरी नदीवर)
- दौलताबादची सिताफळे प्रसिद्ध
- हिमरूशाली व मशरुशाली प्रसिद्ध
- 52 दरवाजांचे शहर,
- मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ,
- पाणचक्की
- अजिंठा व वेरुळ जगप्रसिद्ध लेणी,
- पितळखोरा लेणी
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठ आपेगाव-संत ज्ञानेश्वरांचे जन्मगाव
- पैठण - संत एकनाथांची जन्मभूमी, नाथसागर जलाशय
- दख्खनचा ताजमहाल- बिबिका मकबरा
- घृष्णेश्वर हे ज्योतिलिंग
- नहर-ए-अंबरी ही पाणीव्यवस्था
- खडकी, फतेहपूर, औरंगाबाद ही जूनी नवे
२)जालना-
![]() |
जालना जिल्हा |
- जालना जिल्ह्यात ८ तालुके आहेत.
- संकरित हायब्रिड बी-बीयाण निर्मिती उदयोग
- समर्थ रामदासांची जन्मभूमी-जांब
- जनावरांचा प्रसिद्ध बाजार-मंठा
- कुंडलिका नदीकारी
३)बीड-
![]() |
बीड जिल्हा |
- बीड जिल्ह्यात ११ तालुके आहेत.
- माजलगाव धारण- सिंदफणानदी
- मांजरा प्रकल्प - मांजरा नदी
- बिंदुसरा नदीकाठी
- परळी- वैजनाथ ज्योतिर्लिंग
- राष्ट्रीय औष्णिक विद्युत प्रकल्प - परळी
- सीताफळ फळास नोव्हेंबर 2016 मध्ये GI मानांकन प्राप्त
४)धाराशिव-
![]() |
धाराशिव जिल्हा |
- धाराशिव जिल्ह्यात ८ तालुके आहेत.
- मराठवाड्याचे प्रविशद्वार
- पूर्वीचे धाराशिव,
- भोगावती नदीकाठी
- संत गोरोबाकाकांचे जन्मगाव व समाधी - तेर (तेरणा नदीकाठी)
- पाणीमहाल प्रसिद्ध
५)परभणी-
![]() |
परभणी जिल्हा |
- परभणी जिल्ह्यात ९ तालुके आहेत.
- झुलता मनोरा- चारगणा
- जिंतूर येथे गुहेतील जैन शिल्पकला
- गंगाखेड - संत जनाबाईंचे जन्मस्थळ, दक्षिण काशी
६)हिंगोली-
![]() |
हिंगोली जिल्हा |
- हिंगोली जिल्ह्यात ५ तालुके आहेत.
- कयाधू नदीवर
- संत नामदेवांचे जन्मस्थान- नरसी
- इसापूर धरण (पैनगंगा),
- येलदरी व सिद्धेश्वर धरणे (पूर्णा नदी)
- दसरा महोत्सव प्रसिद्ध
७)लातूर-
![]() |
लातूर जिल्हा |
- लातूर जिल्ह्यात १० तालुके आहेत.
- हलती दिपमाळ- रेणापूर
- जलदूत एक्सप्रेसने लातूर शहरास पाणीपुरवठा (2016 दुष्काळ)
८)नांदेड-
![]() |
नांदेड जिल्हा |
- नांदेड जिल्ह्यात १६ तालुके आहेत.
- विष्णुपूरी ही सर्वात मोठी उपसा सिंचन योजना (शंकर सागर जलाशय)
- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठ
- कोलाम अतिमागास जमात
- श्रीदत्तात्रयांचे जन्मस्थान- माहूर
- उनकेश्वर - गरम पाण्याचे झरे
- गुरु गोविंदसिंगजींची समाधी
- किनवट- अभायारण्य,
- सहस्त्रकुंड धबधबा
भूगोल प्रश्न व उत्तरे Click Now
0 Comments
ही कोणतीही सरकारी वेबसाईट नाही. ही एक प्रायव्हेट वेबसाईट आहे आणि आपणही एक अभ्यासासाठी नोट्स पुरवण्यासाठी तसेच टेस्ट सिरीज वगैरे पुरवण्यासाठी तयार केलेली आहे. संबंधित माहिती आपण official वेबसाईटवरून घेऊ शकतो.