पंचायतराज प्रश्न व उत्तरे मराठी l Panchayatraj mcq in marathi l पंचायत राज व्यवस्था gk questions l पंचायत राज व्यवस्था सामान्य ज्ञान प्रश्न

 पंचायत राज ही एक भारतीय संज्ञा असून तिचा अर्थ ‘ग्रामीण स्थानिक स्वशासन’ असा होय. भारतासारख्या आकाराने मोठ्या व विविध संस्कृती असलेल्या देशात सत्तेचे विकेंद्रीकरण होवून स्थानिकांना अधिकार मिळावेत आणि सुशासन यावे यासाठी पंचायती राज व्यवस्था निर्माण करण्यात आली.

पंचायतराज प्रश्न व उत्तरे मराठी
पंचायतराज प्रश्न व उत्तरे मराठी

स्पर्धा परीक्षांची ऑनलाइन तयारी करणाऱ्या उमेदवारांच्या तयारीला गती देण्यासाठी आमच्या वेबसाइटवर Panchayatraj Quiz in Marathi उपलब्ध आहेत. जे तुम्हाला तुमच्या परीक्षेसाठी सर्वोत्तम तयारी करण्यास मदत करतील. 


स्पर्धा परीक्षेची तयारी करताना पंचायत राज विषय खूप महत्त्वाचे असतात म्हणून आपण या विषयाचे MCQ type question खाली दिलेले आहेत.


खालील प्रश्न तुम्हाला आवडले, तर नक्की आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा.



⚽पंचायतराज प्रश्न व उत्तरे मराठी⚽



 • संविधानातील तरतुदीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्याची जबाबदारी कोणावर आहे?
➡ राज्य निवडणूक आयोग 

• जिल्हा परिषदेच्या सदस्या करिता किमान वयोमर्यादा किती आहे?
➡ 21 वर्ष 

• प्रत्येक गावातील जमीन धारकांच्या नोंदी कोण ठेवतो?
➡ तलाठी 

• महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची जबाबदारी कोणावर आहे?
➡ राज्य निवडणूक आयोग 

• सरपंचाची निवड कोणाकडून केली जाते?
➡ ग्रामपंचायत सदस्य 

• गावात कोतवालाचे नेमणूक कोण करतो?
➡ तहसीलदार 

• 4G वायफाय सेवा देणारी देशातील पहिली नगरपरिषद कोणती?
➡ इस्लामपूर 

• कोतवाल या पदाचे नियुक्ती प्राधिकारी कोण आहेत?
➡ तहसीलदार 

• कोणास शासनाने ग्राम स्तरावरील जन्म मृत्यू निबंधक म्हणून घोषित केले आहे?
➡ ग्रामसेवक 

• महाराष्ट्रात पंचायत राज पद्धती कोणत्या दिवशी अमलात आली?
➡ 1 मे 1962 

• तलाठी या पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यावर नजीकचे नियंत्रण कोणाचे असते?
➡ मंडळ अधिकारी 

• महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कोणत्या वर्षी अस्तित्वात आला?
➡ 1961 

• किती कालावधीनंतर जिल्हा परिषदेची कमीत कमी एक सभा व्हायला हवी?
➡ तीन महिने 

• जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष कोण असतात?
➡ पालकमंत्री 

• पंचायत राज व्यवस्थेचे संबंधित घटना दुरुस्ती कोणती?
➡ 73 वी 

• जिल्हा परिषद स्थायी समितीचा अध्यक्ष कोण असतो?
➡ जिल्हा परिषद अध्यक्ष 

• कोणते उद्दिष्ट पंचायत राज संकल्पनेचे आहे?
➡ लोकशाहीचे शिक्षण 
     लोकांचा प्रशासनात सहभाग 
     सत्तेचे विकेंद्रीकरण 

• पंचायत समिती सभापतीच्या संदर्भात वैधतेचा प्रश्न अथवा वाद निर्माण झाला असेल तर निर्णय देण्याचा अधिकार कोणाला असतो?
➡ विभागीय आयुक्त 

• ग्रामपंचायत सदस्याच राजीनामा द्यावयाचा असल्यास तो कोणाकडे सादर करावा लागतो?
➡ सरपंच 

Panchayatraj mcq in marathi

• जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांना कोणता दर्जा आहे?
➡ राज्यमंत्री 

• जिल्हा नियोजन व विकास मंडळाचा सचिव कोण असतो?
➡ जिल्हाधिकारी 

• महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 अन्वये सामान्यत: किती खेड्यांसाठी पंचायत समितीची रचना करण्यात आली आहे?
➡ 100 

• ग्रामपंचायतींना आपल्या मालकीची संपत्ती भाडे तत्त्वावर द्यावयाची झाल्यास त्याकरिता त्यांना कोणाच्या परवानगीची आवश्यकता असते?
➡ मुख्य कार्यकारी अधिकारी 

• ग्रामसभा कशाची मिळून बनते?
➡ सर्व प्रौढ गावकरी 

• महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि उपसरपंच कसे पदाचुत केले जाते?
➡ सभासदांच्या 2/3 बहुमताने 

• दिनेश चे वय 17 वर्षे आहे तर तो आणखी कमीत कमी किती वर्षांनी ग्रामपंचायतच्या सदसत्त्वासाठी निवडणूक लढवू शकतो?
➡ चार वर्ष 

• गावातील सर्व प्रौढ गावकऱ्यांच्या सभेला काय म्हणतात?
➡ ग्रामसभा 

• पंचायत समितीचा सचिव कोण असतो?
➡ गटविकास अधिकारी 

• ग्रामसभा बोलविण्याची जबाबदारी कोणावर अअसते?
➡सरपंच 
• महानगरपालिकेच्या सदस्यत्वासाठी निवडणूक लढवण्यासाठी किती वर्ष पूर्ण असणे आवश्यक असते?
 ➡21 

• कोणत्या घटना दुरुस्तीने पंचायत राज ला घटनात्मक दर्जा मिळाला आहे?
➡ 73 व्या 

• स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक कोण घेते?
➡ राज्य निवडणूक आयोग 

• जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून कोण काम पाहत असतो?
➡ जिल्हाधिकारी 

• महाराष्ट्रात ग्रामपंचायत सदस्या साठी आवश्यक किमान वयोमर्यादा किती आहे?
➡ 21 वर्ष 

• जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सभापती कोण असतात?
➡ पंचायत समिती सभापती 

• पोलीस पाटील यांचे नियुक्ती कोणाकडून केली जाते?
➡ प्रांत अधिकारी 

• महाराष्ट्रात पंचायतराज व्यवस्था कधीपासून अमलात आली?
➡ 1 मे 1962 

• जिल्हा परिषद निवडणूक खर्च मर्यादा किती असते?
➡ तीन लाख 

• ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी कोण असतो?
➡ सरपंच 

• जिल्हा प्रशासनाचा केंद्रबिंदू कोणाला मानले जाते? 
➡जिल्हाधिकारी 

• तलाठ्याच्या कार्यालयास काय म्हणतात?
➡ सजा 

• ग्रामसभेच्या बैठका वर्षातून किमान किती वेळा घेतल्या जातात?
➡ चार 

• जिल्ह्यातील महसूल प्रशासनाचे प्रमुख कोण असतात?
➡ जिल्हाधिकारी 

• जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव कोण आहेत?
➡ जिल्हाधिकारी 

• महसूल विभागातील फेरफार नोंदणीची संबंधित गाव नमुना कोणता आहे?
➡ गा. न. 6

• जिल्हा परिषदेचा प्रमुख प्रशासन अधिकारी कोण असतो?
➡ मुख्य कार्यकारी अधिकारी 

• 3001 ते 4500 या लोकसंख्येसाठी ग्रामपंचायतचे सदस्य संख्या किती असेल?
➡ 11 

• महाराष्ट्रात एकूण किती कटक मंडळे आहेत?
➡ सात 

• बळवंतराव मेहता समितीने कोणती शिफारस केली होती?
➡ लोकशाहीच्या विकेंद्रीकरणाची 

• पोलीस पाटलाची नेमणूक कोण करतो?
➡ उपविभागीय अधिकारी (प्रांत) 

• उपसरपंच राजीनामा कोणाकडे देतात?
➡ सरपंच 

• ग्रामपंचायत मध्ये कमीत कमी सदस्यांची संख्या किती असते?
➡ सात 

• ई-रेवेन्यू कोर्ट प्रणालीचे उद्दिष्ट काय आहे?
 महसूल कोर्टात चालणाऱ्या सर्व केसेसची ➡कार्यपद्धती संगणकाधारित करणे?

• स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना किती आरक्षण आहे?
➡ 50 टक्के 

पंचायत राज व्यवस्था gk questions

• महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था कधीपासून अमलात आणली?
➡ 1 मे 1962 

• जिल्हा परिषदेच्या प्रमुखास प्रशासन अधिकारी कोण असतो?
➡ मुख्य कार्यकारी अधिकारी 

• जिल्हाधिकारी हा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असावा अशी शिफारस कोणत्या समितीने केली होती?
➡ बळवंतराव मेहता 

• भारतात महिलांसाठी कोठे जागा राखीव आहेत?
➡ पंचायत राज संस्था 

• महाराष्ट्रात जमिनीचा रेकॉर्ड जमीन महसूल व जमीन सुधारणा या संबंधीचा मूलभूत माहिती उपलब्ध करून देणारा शासकीय कर्मचारी कोण?
➡ तलाठी 

• महानगरपालिकेत महत्त्वाचे निर्णय घेण्याचा अधिकार कोणत्या समितीला असतो?
➡ स्थायी 

• ग्रामसभेचे सभासद कोण असतात?
➡ सर्व मतदार 

• गटविकास अधिकाऱ्याची नेमणूक कोणाकडून केली जाते?
➡ राज्य शासन 

• कोतवालाची नेमणूक कोण करतो?
➡ तहसीलदार 

• नगरपरिषदेचा शासन प्रमुख कोण असतो?
➡ मुख्याधिकारी 

• फेरफार नोंदवही म्हणजे गाव नमुना नंबर किती?
➡ सहा 

• तलाठी दप्तरांमध्ये एकूण गाव नमुन्यांची संख्या किती?
➡ 21 
• तलाठी दप्तरातील गाव नमुना नंबर सातबारा म्हणजे काय?
➡ अधिकार अभिलेख व पिकांची नोंदवही 

• जर एखाद्या सरपंचाविरुद्ध न्यायालयामध्ये फौजदारी स्वरूपाचा घटला चालू असेल तर त्याला निलंबित करण्याचा अधिकार कोणाला आहे?
➡ जिल्हाधिकारी 

• कोणत्या राज्यात पंचायत राज अस्तित्वात नाही?
➡ नागालँड 

• महाराष्ट्रात जमिनीचा रेकॉर्ड जमीन महसूल व जमीन सुधारणा मूलभूत माहिती उपलब्ध करून देणारा शासकीय कर्मचारी कोण?
➡ तलाठी 

• भारतीय घटनेचे कोणते कलम ग्रामपंचायत संबंधित आहे?
➡ कलम 40 

• तलाठी आस्थापना कोणत्या अधिकाऱ्याकडे असते?
➡ उपविभागीय अधिकारी 

• जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष कोण असतात?
➡ पालकमंत्री 

• जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेच्या बैठका वर्षातून कमीत कमी किती होऊ शकतात?
➡ कमीत कमी चार वेळा











Post a Comment

0 Comments